जि. प, पं. स. निवडणूक, चार दिवसांत एकूण ६९२ उमेदवारी अर्जाची विक्री

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : कन्नड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी २० जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या ८ गटांतून १३ तर पंचायत समितीच्या १६ गणांतून २३ अर्ज दाखल करण्यात आले. तसेच चार दिवसांत
एकूण ६९२ उमेदवारी अर्जाची विक्री झालेली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहण्यासाठी नागद गटातून २. करंजखेडा १, चिचोली लिंबाजी ३. नामनिर्देशन पत्र २० रोजी पिशोर २, कुंजखेडा २, हतनूर ०२, आणि देवगाव रंगारी ०१ असे एकूण १३ दाखल झाले आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी ३, हतनूर ३. चापानेर १ आणि देवगाव नागद गटातून ०३, घाटशेंद्रा १, चिचोली लिंबाजी ०३, निंभोरा ०१, कुंजखेडा ०५, चिकलठाण रंगारी ०३ असे एकूण २३ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहेत. तर जिल्हा परिषदेसाठी ६४ तर पंचायत समितीसाठी ८४ अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी
तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सारिका भगत, नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे, नायब तहसीलदार प्रशांत काळे, मंडळ अधिकारी विकास वाघ, अव्वल कारकून करण जारवाल, कुणाल दाभाडे, अभिजित पानट, तलाठी दीपक एरंडे यांनी दिली आहे.

मंगळवारी गटनिहाय विक्री झालेले अर्ज : 
नागद ०५, करंजखेडा १०, चिंचोली लिंबाजी-१८. पिशोर-११, कुंजखेडा-०७, जेहुर ०५. देवगाव ०५ व हतनूर-०३ असे एकूण ६४ आर्ज विक्री झाले.

गण निहाय विक्री झालेले अर्ज : 
नागद ८, अंधानेर- ९ चिंचोली  ५, नाचनवेल- १, पिशोर ३. निभोरा ११. कुंजखेडा ८, चिकलठाण २, हतनूर-५, चापानेर- ७. देवगाव  ८. ताडपिंपळगाव- २, जेहूर ००. औराज करंजखंड-००, आणि पाटोदा - १ असे एकूण ८४ उमेदवारी अर्ज विक्री झाले आहेत.